Skip to content Skip to footer

महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला विखे पाटलांनी फिरवली पाठ…

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार ,जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते. परंतु या पत्रकार परिषदेला सर्वांचं लक्ष वेधले ते अनुपस्थितीत राहिलेले काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी, विखे पाटील यांनी या पत्रकार परिषदेस दांडी मारलेली होती. आज ते आपल्या मतदार संघात असल्याचे बोलले जात आहे. विखे पाटलांच्या अनुउपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली. अखेर चार महिन्यांच्या कालावधीनंतर दोन्ही पक्षांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचे नेते हजर होते. काही दिवसापूर्वी नगरच्या जागेवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखेपाटलांचे वाजले होते. त्यामुळे विखे पाटलांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार न करण्याचे ठरविले होते. तसे लेखी पत्र त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना सुद्धा दिलेले आहे.

राधा कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मुलासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून नगरची जागा मागितलेली होती. त्या संदर्भात शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली होती. परंतु शरद पवार यांनी नगरची जागा सुजय विखे पाटील यांना न सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ना-इलाजाने सुजय विखे-पाटील यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे राधा-कृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक वाद झालेले होते. त्यामुळेच महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेस विखे पाटलांनी पाठ फिरवली होती असे बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5