Skip to content Skip to footer

राहुल गांधी पंतप्रधान झल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल – आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. देशात पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं होत. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचं काय होईल. आपला देश कुठं जाईल. देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, आपल्या सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींवर टीका केली होती. मी आपल्या खासदारांच्या प्रचारासाठी येथे आलोय, त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी येथे आलोय असे ही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखविले

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, १० कोटी रुपयांची ऑफर कुणीही स्विकारली असती. मात्र, आपले खासदार म्हणाले, मी जनतेतून आलोय, जनतेचीच कामे करणार. असे म्हणत आदित्य यांनी शिर्डीतील शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे कौतुक केले होते. त्यानंतर बोलताना, मी तुम्हाला विचारतो देशाचे पंतप्रधान कोण सांगा कोण मोदींशिवाय आहे का दुसरा पर्याय. विरोधकांकडे तर दुसरे नावही नाही, असे म्हणत आदित्य यांनी भाषणात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची स्टाईल मारली. तसेच राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टुन नेटवर्क होईल, असेही ते म्हणाले. आदित्य यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनीही दाद दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचाराच्या सभा घेत आहेत. तर, या नेत्यांची मुलेही प्रचारात अग्रेसर झाली आहेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे सक्रीयपणे लोकसभा निवडणूक प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे. आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रसारासाठी आदित्य ठाकरे हे मैदानात ताकदीने उतरले आहे.

Leave a comment

0.0/5