Skip to content Skip to footer

अखेर प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता खा. अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अशोक चव्हाण हे पत्नी आमदार अमीता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र पक्ष श्रेष्ठींकडून अशोक चव्हाण यांचेच नाव जाहीर केल्याने अखेर चव्हाणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आमदार अमीता चव्हाण यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशोक चव्हाण यांनी आपण लोकसभेच्या निवडणुकीला न उतरता त्याची पत्नी अमिता अशोक चव्हाण या खासदारकीच्या रिंगणात उतरणार होत्या असे वक्तव्य सुद्धा केले होते.

अशोक चव्हाण हे येणाऱ्या विधासभेला मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते त्याच मुळे ते दिल्लीत जाण्यासाठी काही खास उस्साही सुद्धा दिसून येत नव्हते. त्यांच्या बरोबर राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा काँग्रेस पक्षा कडून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. नांदेड लोकसभा मतदार संघातून चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक यशपाल भींगे रिंगणात आहेत. त्यामुळे नांदेडचा गड राखने चव्हाणांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चव्हाण यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमलकिशोर कदम, बापुसाहेब गोरठेकर इत्यादी नेते उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5