खासदार आनंदराव अडसूळ तीन वेळा बुलढाणा व दोन वेळा अमरावती मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तिसर्यांदा अमरावती मतदार संघातून आता उभे आहे. यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे यांच्यासह भाजपचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांसह हजारो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भारताना कार्यकर्त्यां मध्ये जोश निर्माण झालेला होता. त्यात युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे अनेक तरुण उपस्थित होते.
आनंदराव अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यानंतर एका भव्य रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. यावेळी रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, शाम देशमुख, महानगर प्रमुख सुनील खराटे तसेच भाजपचे जिल्हाप्रमुख दिनेश सूर्यवंशी, शहरप्रमुख जयंत डेहणकर, तसेच भाजपचे इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक इर्विन चौकातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीत भगवा झंझावात संचारला होता. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणेने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. ही रॅली गल्र्स हायस्कूल चौकात गेल्यानंतर रॅलीत युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे व शिवसेना नेता अनिल देसाई रॅलीत सामिल झाले. त्यावेळी घोषणेने हायस्कूल चौक दणाणून गेला होता. ही भव्य दिव्य रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. त्यानंतर खासदार आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रविण पोटे, आदीत्य ठाकरे, अनिल देसाई, सह शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आनंदराव अडसूळ यांचा अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला होता.