Skip to content Skip to footer

हातकणंगने मतदार संघातील प्रचाराची धुरा सदाभाऊ खोत यांच्याकडे

येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची पहिली जाहीर सभा कोल्हापूरच्या करवीर नगरीत पार पडली या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दोन्ही उमेदवारांना भारी बहुमताने निवडणूक आणायचे आव्हानच केले आहे. त्यातच हातकणंगने मतदार संघातून धैर्यशील माने हे निवडणुकीचे उमेदवार आहे तर त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि महाआघाडीचे राजू शेट्टी हे उमेदवार म्हणून आहे. त्यामुळे ही लढत अधिकच चुरशीची असणार असेच बोलले जात आहे.

हातकणंगने मतदार संघातून धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा कधीकाळी राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक असणारे सदाभाऊ खोत यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना ही निवडणूक जड जाणार अशीच चर्चा सध्या त्यांच्या मतदार संघात बोलून दाखवली जात आहे. आज राजू शेट्टी यांनी महाआघाडीत सामील होऊन आपल्याच मतदार संघातील शेतकऱ्यांना नाराज केले आहे. खरं पहिले तर शेट्टी यांचा चालू झालेला लढा हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कारखानदार नेत्यांशीच सामना चालू झाला होता परंतु आज सत्तेच्या हव्यसापोटी शेट्टी यांनी राजकीय कारकीर्तीत विरोध केलेल्या त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या मांडीला-मांडी लावून त्यांचा प्रचार करताना खासदार राजू शेट्टी आज दिसत आहेत.

Leave a comment

0.0/5