आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील खासदारांनीं आपल्या मतदार संघात कामासाठी किती टक्के निधी वापरला होता त्याची टक्केवारी सध्या समोर आलेली आहे. त्यात सुद्धा राज्यात सर्व पक्षाला मागे टाकून शिसवेना पक्षाने बाजी मारलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण पुढे घेऊन जाताना शिवसेना पक्षाचे सर्वच खासदार दिसून येत आहे. त्यात उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या खासदारकी फंडातून १३३.४३% निधी हा विभागातील कामासाठी खर्च करून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार संसदरत्न राहुल शेवाळे यांचे नाव जाहीर झालेले आहे. त्यांनी आपल्या निधीतून ११७.६९% जनतेच्या हिताची कामे केलेली आहे. तर पाचव्या क्रमांकावर ठाणे शहराचे खासदार राजन विचारे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे. खासदार राजन विचारे यांनी १०१.०१ % निधी वापरला आहे. तर ६ व्या क्रमांकावर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे. त्यांनी १००.९८ % निधी जनतेच्या कामासाठी वापरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे शिवसेना पक्षाचे चारही खासदार केंद्रात भगवा फडकवणारच असा विश्वास खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.