Skip to content Skip to footer

सभा नसताना पळापळ, रिकाम्या रेल्वेनं प्रवास पार्थ पवार पुन्हा ट्रोल

पार्थ अजित पवार यांचे पहिले भाषण चांगलेच गाजले होते. या भाषणाची चांगलीच नेटकऱ्यांनी खिल्ली सुद्धा उडवली होती आता पार्थ पुन्हा एकदा नेटकऱ्याच्या रडारवर आलेले आहे. विषय असा की काही दिवसापूर्वी पार्थ पुन्हा स्टन्ड करताना आपल्या मतदार संघात दिसून आलेले होते. पार्थ उशीर झाला म्हणून आपल्या दोन-चार कार्यकर्त्यां बरोबर पनवेलच्या रस्त्यावरून पाळताना दिसून आले होते. त्यावेळी असे सांगण्यात आले की, पनवेल मोहल्ला येथे पार्थ यांची सभा होणार होती परंतु अश्या कोणत्याही प्रकारची सभा पार्थ यांची नव्हती अशी माहिती समोर आलेली आहे तसेच त्या व्हिडिओतून पार्थ यांच्या आजूबाजूला ट्रॅफिकची समस्या सुद्धा दिसत नव्हती मग नेमके गाडीतून खाली उतरून पार्थ फक्त स्टन्ड म्हणूनच पळत असताना दिसत होते.

तसाच अजून एक प्रकार समोर आलेला होता पार्थ यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनल ते पनवेल असा सकाळचा रेल्वेने प्रवास सुद्धा केलेला दिसून येत होते. या प्रवासात सुद्धा आपल्या दोन-चार कार्यकर्त्यां बरोबर ते प्रवासात प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहे असे दाखविण्यात आले होते. परंतु चाकरमानी हे पनवेल ते सीएसटी असा प्रवासा करतात परंतु पार्थ यांनी त्याच्या उलट प्रवासा केलेला दिसून येत होता त्यामुळे पार्थ पवार यांचा ह्या विषयाची सुद्धा नेटकऱ्यांनी खिल्ली उडवलेली होती. आज अश्या विचित्र वागण्याने पार्थ पवार महाराष्ट्रात हास्याचा विषय बनले आहे. एकीकडे संसदरत्न श्रीरंग बारणे आणि दुसरीकडे चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाज पार्थ पवार यांच्या पैकी कोणाला जनता निवडणार हे येणाऱ्या २३ मे ला समोर येईल.

Leave a comment

0.0/5