Skip to content Skip to footer

कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात वाद वाढण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीला कोल्हापूर मतदार संघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार मंडलिक आणि राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. परंतु याच जागेवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती असली तरी कोल्हापूर जिल्यातील काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा न देता शिवसेनेच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे येन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षाची पंचायत झालेली कोल्हापुरात दिसून येत आहे.

ह्या खऱ्या वादाची सुरवात २०१४ च्या विधानसभा निवडणुकी पासूनचं चालू झाली होती. धनंजय महाडिक यांनी निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी जीवाचे रान केले आणि निवडून सुद्धा आणले परंतु येन विधानसभा निवडणुकीला सतेज पाटील यांच्या विरोधात धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक हे निवडणुकीत भाजपा पक्षातून मैदानात उतरले होते. धनंजय महाडिक यांनी पाटील यांना मदत न करता आपले चुलत बंधू अमल यांना मदत केली. त्याचमुळे आगामी लोकसभा निवडणुकीला महाडिक यांना पडणारच असे सतेज पाटील यांनी ठरविले आहे.

खरे तर धनंजय महाडिक यांनी विधानसभेला सतेज पाटील यांना मदत करायला हवी होती. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीला सुद्धा धनंजय महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मदत न करता भाजप पक्षाला उघड उघड मदत करून भाजपा आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी सौ. महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद भेटण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपा पक्षाची सत्ता स्थापन झाली होती. या घडलेल्या सर्व घडामोडीमुळे गद्दाराला मदत करायची नाही असेच सतेज पाटील आणि समर्थकांनी ठरवले आहे आणि याचा फटका लोकसभेला राष्ट्रवादीचे महाडिक यांना बसणार आहे असेच बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5