हातकणंगले मतदार संघातील शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ हातकणंगले मतदार संघात धडाडली होती. माझी चूक झाली नको त्या माणसाला जागा सोडली असे बोलून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेला मंत्री चंद्रकातदादा पाटील, मंत्री सदाभाऊ खोत तसेच शिवसेना आणि भाजपा पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. धैर्यशील मला तुझं कौतुक आहे की तू भाषण कसे करायला हवे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आमची निवड ही सार्थ झाली आहे. मला शिवसेनाप्रमुखांनी मागे सांगितलं आपल्यावर विश्वास टाकतील त्याला सोडायचं नाही. मी तुम्हाला वचन देतो की धैर्यशील याची जबाबदारी मी घेतली आहे. त्याने मला वचन दिले की या जन्मी शिवसेने मध्येच राहणार मला आणखीन काय हव आहे. सदाभाऊ तुम्ही पण आधी शिवसेनेत होता. तुम्ही त्यांच्यासोबत होता आपल्या दोघांनाही चूक समजली आहे. शेतकऱ्यांसमोर डोळ्यातलं पाणी काढायचं आणि मत मागायची हेच शेट्टी यांनी केले आहे असे उदगार सभेत उद्धव ठाकरे यांनी काढले होते.
मध्यंतरी नाशिक विभागातून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने येत होते. म्हाताऱ्या बायका पायला तडे गेलेले गरीब शेतकरी रक्ताळलेल्या पाय घेऊन हे शेतकरी मुंबईकडे निघाले होते. तो आपल्याला जगवण्यासाठी कष्ट करतो रक्त सांडतो. मी सेनेच्या आमदार आणि खासदारांना सांगितले त्या शेतकऱ्यांचे स्वागत करा त्यांची राहण्याची सोय करा जेवणाची सोय करा. त्यांची सोय ही शिवसेनेने केली होती. आम्ही तेव्हा हा विचार केला नाही की हा कोणत्या पक्षाच्या शेतकऱ्याने आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. आमचं नातं शेतकर्यां बरोबर आहे आणि ते आम्ही जागृत ठेवल आहे. पायातून रक्त येते त्या रक्ताशी माझं नातं आहे आणि हे नातं जपण्यासाठी मी काम करत आहे. पाच वर्षातील आमचे आणि भाजपाचे संबंध जे काही चांगले होते वाईट होते ते जगजाहीर होते. पण चंद्रकांतदादा मला जरा सांगा मी तुमच्या कोणत्याही चांगल्या कामांमध्ये मी पाय घातला का ? असा सवाल सुद्धा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारला होता.
पुढे राहुल गांधी यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत टीका केली मी राहुल गांधी यांना सांगत आहे, ही निवडणूक माझी मातृभूमी, माझा देश कोणाच्या हातात द्ययचा आहे यासाठी ही निवडणूक आहे. चंद्रकांत दादा हे तुम्ही सांगितलं वसंतदादा पाटलांची ही भूमी आहे आणि याच भूमीत दादांच्या पाठीत वार करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सुद्धा टीका केली. जो देशद्रोही असेल तो कोणीही असेल त्याला आम्ही फासावर लटकवल्या शिवाय राहणार नाही. ३७० कलम रद्द करणार नाही असे राहुल गांधी बोलत आहे, शिवसेनाप्रमुख म्हणाले होते जे देशाचे तुकडे करणार त्याचे पहिले तुकडे करा, इथे देशप्रेमी जन्माला येतात देशद्रोही नाही असे उद्गार सभेला काढले होते.