Skip to content Skip to footer

माढा मतदार संघात काँग्रेस फुलवणार कमळ

आघाडीत एकत्र असून सुद्धा एकमेकांना संपवण्याचा डाव राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेते मंडळी महाराष्ट्रात खेळताना दिसत आहे. मात्र हे करताना काँग्रेस पक्षाला साताऱ्याचा बालेकिल्ला वाचवण्यात अपयश आलेले आहे हे आजच्या परिस्थितीला दिसून येत आहे. आता काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष भाजपात गेला. त्यात एका आमदाराने आघाडीचा धर्म न पाळता माढा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीला मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे माढा मतदार संघात राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. एकेकाळी साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार करणारे शरद पवार यांचा पक्ष सध्या साताऱ्यातून हद्दपार होण्याच्या वाटेवर दिसून येत आहे.

सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्यानंतर आता शरद पवार यांचे ऐकू लागला होता. सुरवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा हा जिल्हा राष्ट्रवादीच्या स्थापने नंतर राष्ट्रत्वादी आपले वर्चस्व सातारा जिह्यात वाढवू लागला होता. त्यातच काँग्रेसची आर्धी निम्मी फौज राष्ट्रवादी पक्षात सामील झालेली होती व त्यांनी पक्षाचे अध्यक्ष पवाराच्या नेतृत्वाखाली वाटचाल चालू केली. राष्ट्र्वादीने एक-एक करत सर्वच सरकारी संस्था काँग्रेसच्या हातातून काढून घेण्याचे काम चालू केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिव्हा बँक यांच्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढत चालले होते. तसेच काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादीचे पवार ठरवत होते. ज्या जिल्यात काँग्रेसचे आमदार खासदार होते त्या जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचा एक खासदार आणि पाच आमदार निवडून आले होते.

आघाडीच्या सत्तेत असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात राष्ट्रवादीच्या मुसक्या आवळायला सुरवात केली होती. यात जिल्हा बँकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला परंतु या दोघाच्या भांडणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातुन गेली. आणि युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. आज राष्ट्रवादीला रोखण्यासाठी काँग्रेसने आपले पदाधिकारी भाजपच्या दावणीला बांधल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्येक तालुक्यात भाजपाची ताकद वाढत असताना दिसत आहे आणि याला जबाबदार फक्त काँग्रेस पक्ष आहे असेच आज बोलले जाते. आज पर्यंत ज्या राष्ट्र्वादीने काँग्रेस पक्षाचा सत्ते पर्यंत पोहचण्यासाठी फक्त उपयोग केला त्या राष्ट्रवादीला आगामी लोकसभा निवडणुकीला धडा शिकवण्याचे काम सध्या काँग्रेस पक्ष करत असताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5