Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांची महाआघाडीसाठी पहिला सभा नांदेड मध्ये

लोकसभा निवडणुकीला मनसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात प्रचार करणार असे खुद्द राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जाहीर केले होते. त्याचा एक भाग म्हणूनच आज राज ठाकरे नांदेड मध्ये भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात सभा घेणार आहे. राज ठाकरे प्रथम नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा मध्ये जाणार आहे. त्या नंतर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां बरोबर संवाद साधणार आहे. प्रताप चिखलीकर यांच्या विरोधात नांदेड मध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे चिखलीकरांना विरोध करून चव्हाण यांना फायदा पोहचवण्याचे काम राज ठाकरे करताना दिसत आहे.

राज ठाकरे आणि काँग्रेस पक्षातील वाद हे साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या महाआघाडीत राष्ट्रवादी मनसेला घेण्यासाठी उस्सुक होती. परंतु अशोक चव्हाण यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी नाकारले होते. कारण राज ठाकरे यांना आघाडीत घेतल्या नंतर इतर परप्रांतीय काँग्रेस मतांवर परिणाम होऊ शकतो अशी त्या मागे अशोक चव्हाण यांचे मत होते. त्यामुळे नाइलाजाने राष्ट्रवादीने सुद्धा आपले मत बदलले होते. आज त्याच अशोक चव्हाण यांच्या मदतीला राज ठाकरे धावून गेल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

आज पर्यंत आपल्या भाषणात काँग्रेस नेत्यांवर टीका करणारे राज ठाकरे कसे काय काँग्रेस नेत्यांना मदत करण्यासाठी सभा घेऊ शकतात असाच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. ज्या अशोक चव्हाणांनी राज ठाकरे यांचा आणि त्यांच्या भूमिकेचा सतत विरोध केला आहे, तसेच सत्तेत असताना राज ठाकरे यांच्यावर कारवाही करून जेल मध्ये सुद्धा डांबले होते त्याच अशोक चव्हाण यांना विजय करण्यासाठी राज ठाकरे घेत असलेली सभा सध्या तरी जनतेला आणि मनसे कार्यकर्त्यांना रुजलेली दिसत नाही आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेचा फटका आगामी विधानसभेला मनसे उमेदवारांना बसू शकतो हे नाकारता येत नाही.

Leave a comment

0.0/5