Skip to content Skip to footer

कोल्हापूर जिह्यातील शिवसैनिकांचा आज मुंबईत मेळावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोल्हापूरवासीयांचा मेळावा रविवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृह येथे होणार आहे. या मेळाव्यात मुंबईत वास्तव्यास असलेले सर्व कोल्हापूरवासीय बंधू-भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर शिवसेना पक्षाने प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष पूर्ण ताकतीने या दोन्ही जागा जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

या मेळाव्यात मुंबई तसेच कोल्हापूरमधील युतीच्या उमेदवारांचा प्रचार आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अरविंद सावंत, कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, दगडू सकपाळ, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, नगरसेविका श्रद्धा जाधव, आशीष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, प्रकाश पाटील, निवेदिता माने, प्रकाश आबिटकर आदी उपस्थित राहणार आहे. तसेच मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूर वासियांना शिवसेनेला मतदान करण्याचे आव्हान देणार आहे

Leave a comment

0.0/5