Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे नवाब मलीक प्रवक्ते कमी पण भविष्य सांगणारे जोतिषीच जास्त वाटतात.

देशातील एकूण परिस्थिती भाजपा सरकारला अनुकूल नाही त्यामुळे पुन्हा सत्ता येईल का? या बद्दल भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत मांडलेले होते. गेल्या पाच वर्षात कधी नव्हे इतकी बेकारी वाढलेली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाने कितीही आटा-पिटा केला तरी १६० च्यावर भाजपच्या जागा निवडणून येणार नाही असे मत सुद्धा पत्रकार परिषदेत मलीक यांनी बोलून दाखविले.

मालिकांच्या वक्तव्या वरून राष्ट्रवादी मध्ये पवारांनी नवीन जोतिषाची भरती केलेली जाणवत आहे. निवडणुकीचा निकाल आधीच जाहीर करून नवाब मलिक यांनी प्रवक्ते पद सोडून जोतिष सांगण्याचा व्यवसाय चालू केला तर त्यातून काहीतरी कमाई त्यांची जरूर होईल असेच जाणवते. आज राष्ट्रवादी फक्त भाजपावर आरोप करून मत मागायचे काम करताना दिसत आहे कारण जर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात विकासाची कामे केली असती तर आज जनतेने तुम्हाला सत्तेपासून दूर केले नसते. आज राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची नावेही घोटाळ्यात अडकलेली आहे. भुजबळ, तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि यांचा मुखिया शरद पवारांचे नाव सुद्धा घोटाळ्यात अडकलेले आहे.

आज कुठेतरी खोटी माहिती देऊन आरोप-प्रत्यारोप करून भाजपा पक्षाला बदनाम करण्याचे काम आपण आणि आपला पक्ष करताना दिसत आहे. आजही आपल्या पक्षाचे माजी मंत्री छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहे आणि कधीही अजित पवार यांना सिचन घॊटाळ्यातं अटक होऊ शकते म्हणूनच आज आपल्या पक्षाच्या नेत्यांना इमानदारीने धडे देणे अधिकच गरजेचे झालेले आहे. म्हणूनच आज आपल्या निवडणुकीला प्रचारासाठी बाहेरील दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागते अशी तुमची अवस्था आहे आणि उद्या जर तुमचा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन झाला तर महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य वाटणार नाही.

Leave a comment

0.0/5