Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिक्रापूर येथे सभा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षसाठी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जागेपैकी शिरूर मतदार संघात पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिक्रापूर येथे २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. शिरूर मतदार संघात महायुती कडून खासदार शिवाजी अढळराव पाटील हे रिंगणात आहे तर राष्ट्रवादी पक्षाकडून काही महिण्यापुर्वी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले शिवसेना पक्षाचे बंडखोर कार्यकर्ते अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

खासदार शिवाजी अढळराव पाटील हे मागील १५ वर्षा पासून शिरूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पुणे नाशिक लोहमार्ग, बैलगाडा शर्यत या प्रश्नावर प्रखरपणे संसदेत आपले मत सुद्धा पाटील यांनी मांडले आहे. त्यामुळे शिरूर मतदार संघात जनता खासदार पाटील यांच्या मागे उभी राहिलेली दिसत आहे. उद्या होणाऱ्या सभेला मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिरूर मतदार संघाचे अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार आपल्या शैलीत शिरूरच्या मैदानांवर बॅटिंग करणार हे आज होणाऱ्या सभेला दिसून येईल. या सभेला शिवसेना आणि भाजपा पक्षाचे मंत्री तसेच जिल्हा पातळीवरील नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.असे सुद्धा सांगण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5