Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरे यांचे संगमनेर सभेपूर्वी शिर्डी साई बाबाचे दर्शन घेतले…….

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संगमनेर येथे जाणता राजा मैदानावर सभा होत आहे. या सभेपूर्वी उद्धव ठाकरे पत्नीसह साईबाबांच्या दर्शनाला गेले. यावेळी शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिर्डीच्या साईबाबांकडे युतीचे सरकार येऊ दे म्हणून साकडे सुद्धा घातले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर शिवसैनिकांनी भव्य स्वागत केले. खासदार सदाशिव लोखंडे व आमदार दराडे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख संजय शिंदे, शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे हे उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5