Skip to content Skip to footer

युतीत मतभेद झाले पण भगव्याशी गद्दारी केली नाही – उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीत एकमेकांना शह देण्यासाठी ५६ पक्ष एकत्र आले आहेत. या निवडणुकीत आम्ही भगव्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमच्या युतीवर टीका करणाऱ्यांनी ती खुशाल करावी. मात्र, भगवा खाली घेण्यासाठी तुमच्या ५६ पिढ्या जरी एकत्र आल्या तरी भगवा उतरवू शकत नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेर इथे झालेल्या सभेत केली. संगमनेर येथे भाजपा-शिवसेना पक्षाचे लोकप्रिय उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येथे आले होते. या सभेला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीसह शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेऊन पुढे ते सभेकडे रवाना झाले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे,मुंडे,महाजन यांनी आपले आयुष्य भगव्यासाठी वेचले मात्र आता देश स्वातंत्र करण्यासाठी लढणारी काँग्रेस राहीलेली नाही. राहुल गांधी हे देशद्रोह करणारे कलम रद्द करण्याची भाषा करतात. आमच्याकडे जे अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत तर ते पाकिस्तानसाठीच ठेवले आहेत. देशद्रोह कोणी केला तर त्यास आम्ही फासावर चढविणारे आहोत. आपला देश भागव्याच्या दिशेने न्यायचा का देशद्रोहाचे कलम रद्द करणार्‍या राहुल गांधींच्या मागे न्यायचा हे तुम्ही ठरवा असेही त्यांनी बोलून दाखविले होते. आम्ही शरद पवारांसारखे पळपुटे नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी पवारांवर सुद्धा जोरदार टीका केली होती.

Leave a comment

0.0/5