मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संसदरत्न खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची झंझावात सभा मावळ मतदार संघात मोठ्या जनसंख्येने पार पडली. आज संपूर्ण महाराष्ट्र फिरून झाले आहे आणि यात संपूर्ण राज्य हे भगव झालेलं या परिस्थितीला दिसून येत आहे. कोल्हापूरकरांनी सांगितलं आमचं ठरलंय हे वाक्य विरोधकांनी उचललं. आम्ही विचारलं काय ठरलंय? आमचं ठरलं की घरीच बसायचं असा टोला विरोधकांना लगावला. या बारामतीच्या भानामती यावेळी महाराष्ट्रात चालू देणार नाही असे सुद्धा सांगितले. या सभेला मावळ मध्ये राष्ट्रवादी सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची सुद्धा आठवण करून दिली
.
पाऊस पडत नाही तेव्हा आम्ही काय धरणात…. असं बोलणाऱ्यांना तुम्ही तुमचे मत देऊ शकता का? असा सवाल उपस्थित जनतेला उद्धव ठाकरे यांनी केला. मी नाहीतर माझा मुलगा नाहीतर माझा पुतण्या. दुसऱ्यांना काही मुलं होत नाहीत का? आज साताऱ्या मध्ये आम्ही एका माथाडी कामगारांच्या मुलाला तिकीट दिली. अण्णासाहेब पाटील म्हणाले होते की माथाडी कामगारांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. अण्णासाहेब यांनी आपले आयुष्य संपवून घेतले होते. त्यामुळे आम्ही ठरवलंय दिल्ली पुन्हा काबीज करायची.