मुघलांना जसे पाण्यात संताजी-धनाजी दिसते होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उठसूट कमळ दिसू लागल्याचा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी ठाण्यात लगावला
१७ ते १९ मे दरम्यान होणार्या पहिल्या सोलापूर महोत्सवाची माहिती देण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे ठाण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी ईव्हीएम मशिनबाबत उपस्थित केलेल्या शंकेबाबत त्यांना विचारणा झाली असता, देशमुख यांनी हा टोला हाणला. शरद पवार हे गेली ५० वर्षे राजकारणात आहेत. त्यांना राजकारणातील सर्व गोष्टी न्यात आहेत. आता त्यांना विजय आणि पराभवाची चाहूल लागली असेल. त्यामुळे ईव्हीएम मशिनचे कुठलेही बटण दाबले तर कमळाला मत जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. पवारांना खात्री आहे की आपला पराभव होणार आहे. त्या पराभवाच्या आधीची पार्श्वभूमी ते तयार करीत आहेत.