Skip to content Skip to footer

केजरीवालांनी विकले ६ कोटीला एक तिकीट, उमेदवाराचा आरोप……

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतील सातही जागांवर उद्या मतदान होण्याच्या आधीच आम आदमी पार्टीविरोधातील एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पश्चिम दिल्लीचे आम आदमी पार्टीचे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्यानंतर उमेदवारी मिळाल्याचं माझ्या वडिलांनीच मला सांगितलं होतं. मी त्यांना पैसे देऊन तिकीट घेण्यास विरोध केला होता, असं उदयने सांगितलं. उदयच्या म्हणण्यानुसार त्याला उच्च शिक्षणासाठी पैसे हवे होते. मात्र त्यांच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यांनी उदय यांना पैसे देण्याऐवजी केजरीवाल यांना पैसे दिले होते.

Leave a comment

0.0/5