Skip to content Skip to footer

मोदींवर टीका करणाऱ्या मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे – रामदास आठवले

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी नेत्यांमधील शाब्दिक चकमकी वैयक्तिक पातळीवर पोहोचल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या मायावती यांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी समाचार घेतला आहे. मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे, त्यानंतर मोदींबद्दल बोलावे अशा शब्दात आठवलेंनी टीका केली. उत्तर प्रदेशमधील भेलूपुर येथील पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीला सोडणारे नरेंद्र मोदी हे बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे जाणणार. अशी टीका मायावतींनी सीरगोवर्धन येथील सभेत केली होती. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले की, मायावती यांना माहित आहे की, मोदींच लग्न झालेले असून त्यांच्या पत्नी शिक्षका आहेत. त्यांनी मोदींवर वैयक्तिक टीका नको करायला हवे होते. मायावतींनी आधी लग्न करावे त्यांनतर टीका कराव्यात असा टोला आठवलेंनी लगावला.

भाजपला मनुवादी म्हणणाऱ्या मायवती त्याच भाजपसोबत ३ वेळा सत्तेत राहिल्या आहेत. त्यावेळी सत्ता पहिजे होती म्हणून भाजप त्यांना मनुवादी दिसला नाही. २०१४ मध्ये पक्षाला यश मिळाले नाहीत म्हणून आता भाजपवर टीका करतात, असे आठवले म्हणाले. पश्चिम बंगालच्या परिस्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बनर्जी या घाबरल्या आहेत. अमित शहांच्या रोड शो वर हल्ला कुणी केला हे सुद्धा ममतांना माहित आहे .कुणाची झोप उडाली आहे हे लवकरच समोर येईल. महाआघाडी अपयशी ठरली असून, देशाचा दलित मतदार आमच्या सोबत असल्याचा दावा आठवले यांनी केला.

Leave a comment

0.0/5