Skip to content Skip to footer

पवारांना उलट-सुलट कमळचं दिसत आहे – सुभाष देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे गेली ५० वर्षे राजकारणात आहेत, त्यांना राजकारणातील वारे लवकर कळते. आता लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने ते ईव्हीएम खराब असल्याचं बोलत आहेत. उठसूट सगळीकडे कमळचं दिसत आहे, असा घणाघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. सोलापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. शरद पवार यांना पराभवाची चाहूल लागली आहे, ईव्हीएमवर घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत जात, ते सांगत आहेत. त्यामुळे पवार हे पराभवाची पार्शवभूमी तयार करत आहे, अशी टीका सुभाष देशमुख यांनी केली आहे.

येणाऱ्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालात राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या जागेपैकी मावळ आणि बारामती जागेवर राष्ट्रवादीला आपला पराभव दिसून येत आहे. सोलापूर फाउंडेशनच्या वतीने १७ ते १९ मे दरम्यान ठाण्यामध्ये सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील खाद्य पदार्थांची चव ठाणेकरांना चाखायला मिळणार आहे. तसेच सोलापुरी संस्कृतीचे दर्शन देखील येथे होणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Leave a comment

0.0/5