Skip to content Skip to footer

राज ठाकरे झाले फ्लॉप, सेना-भाजपा सुसाट…….

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळे कुठेतरी भाजपाच्या जागेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. राज ठाकरे यांचे “लाव रे तो विडिओ” ही लाईन संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली होती. परंतु देशातील सातव्या आणि शेवटच्या मतदाना नंतर प्रसार माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्सझिट पोल नुसार देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असेच चित्र साध्य दिसून येत आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरे यांनी भाजप, विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. न्यूज १८ नेटवर्कच्या सर्व्हेत भाजप सेना युतीला ४२ ते ४५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे इंडिया टुडे माय इंडिया यांनीही ३८-४२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विशेष,म्हणजे, एक्झिट पोलमध्ये विश्वासाचा समजला जाणाऱ्या चाणक्यनेही भाजप युतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. युतीला ३८ पेक्षा जास्त जागा मिळतील, असं अंदाज वर्तवला आहे.

Leave a comment

0.0/5