Skip to content Skip to footer

मावळ मधील पार्थच्या पराभवाची जबाबदारी माझी – अजित पवार

लोकसभेच्या निकाला नंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मावळमध्ये मुलगा पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. “मावळमध्ये पार्थचा झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे”, असे अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव केला.

लोकसभा निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आज बैठक पार पडली. बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, यांच्यासह मित्र पक्षातील हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी उपस्थित होते

Leave a comment

0.0/5