Skip to content Skip to footer

संपूर्ण महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ – मिलिंद नार्वेकर

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, या प्रश्नावर मिलिंद नार्वेकर यांनी उत्तर दिलं की, “संपूर्ण महाराष्ट्रच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल.”युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास 100 टक्के आवडेल, पण हा निर्णय स्वत: आदित्य किंवा उद्धवजी घेतील, असं मिलिंद नार्वेकर म्हणाले.

 

“हीच वेळ आहे… हीच संधी आहे. लक्ष्य- विधानसभा 2019, महाराष्ट्र वाट पाहतोय आदित्य ठाकरे..” युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्या यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टनंतर आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याविषयी मिलिंद नार्वेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, “निवडणूक लढवण्या बाबतचा निर्णय आदित्य ठाकरे स्वत: किंवा उद्धव ठाकरे घेतील. निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील त्यांचं शिवसैनिक स्वागत करतील

Leave a comment

0.0/5