Skip to content Skip to footer

काँग्रेस पक्षाचे बरेच आमदार भाजपच्या संपर्कात – सुधीर मुनगंटीवार

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातून सुफडा-साफ झालेला आहे. आज महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकुलता एक खासदार निवडणून आलेला आहे. तर अख्या देशात पुन्हा एकदा जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपाला एकहाती सत्ता दिलेली आहे. आता जनतेच्या भावना काँग्रेस नेत्यांना सुद्धा समजल्या आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे बडे नेते भाजपा नेत्यांच्या संपर्कात आलेले आहे असे वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच औषधा प्रमाणे काँग्रेसची “एक्सपायरी डेट” संपलेली आहे असा टोला सुद्धा लगावला होते. पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत मांडलेले होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते. बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले, ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा-शिवसेना युतीला भरघोस यश दिले, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील राज्यात युतीला दमदार यश मिळणार आहे, यात कुणाचेही दुमत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीची जी स्थिती १७ राज्यांमध्ये झाली आहे, ती स्थिती बघता काँग्रेस पक्ष हा उभा होऊच शकत नाही, असे चित्र आहे.

भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी जे निर्णय घेतले, त्यावर जनतेने विश्वास प्रकट केला आहे. राज्य सरकारने देखील लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील सहजपणे जिंकू, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या नव्या नेत्यांची वर्णी लागते हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5