Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या बैठकीचा तपशील गणेश नाईक यांनी वृत्तपत्रांना सांगितला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पक्षातील सर्व मोठे नेते तसेच लोकसभा निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार हजर होते. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर विधानसभा निवडणुकांत कामगिरी सुधारण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीत नेमकं काय झाले, याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी माहिती दिली आहे. ‘लोकसभा निवडणूक पराभवाचे चिंतन या बैठकीत करण्यात आले आहे. विजय झालेल्या आणि पराभव झालेल्या मतदारसंघांची तपशीलवार माहिती घेतली गेली,’ अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या या बैठकीत वंचित फॅक्टरवरही चर्चा करण्यात आली. वंचित आघाडीचा फटका लोकसभेत बसला याबाबत काही उमेदवारांनी भूमिका मांडली.तर वंचित बहुजन आघाडी सोबत येणार नाही हे समजून पुढील राजकीय गणित करायला हवे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मांडली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं अपयश आले. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखायची ठरवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5