Skip to content Skip to footer

दापोली येथील निधी अभावी प्रलंबित उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी आमदार योगेश कदम यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन.

दापोली येथे २०१३ साली मंजुरी मिळालेल्या १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम मागील ७ वर्षांपासून निधी अभावी रखडले आहे. रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरु व्हावे व त्यासोबतच अतिदक्षता विभाग व स्वतंत्र लॅब ला मंजुरी मिळावी यामुळे रुग्णांचे होणारे हाल थांबतील असे निवेदन आमदार योगेश कदम यांनी दिले आहे. प्राथमिक सुविधांसोबतच अद्यावत सुविधा मिळणे गरजेचे झालेले आहे या बाबी लक्षात घेऊन आमदार योगेश कदम यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्या कडे उपरोक्त विषयी निवेदन केले.
रुग्णांची गैरसोय पाहून व भविष्यातील संभाव्य गरजा लक्षात घेऊन आमदार योगेश कदम यांनी रुग्णालय अद्यावत करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय मंत्री महोदयांनी लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जेणेकरून रुग्णांची होणारी पायपीट आणि गैरसोय थांबेल.

Leave a comment

0.0/5