Skip to content Skip to footer

जनता पुन्हा राज्यात भाजपाच्या हाती सत्ता देणार – मुख्यमंत्री

राज्यातील जनतेची उरलेली कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करू. मात्र, ही कामे जर तीन महिन्यात पूर्ण झाली नाही तरी, ज्याप्रमाणे जनतेने केंद्रात भाजपाला सत्ता दिली. त्याप्रमाणे राज्यात देखील देणार आहेत, असा विश्वास व्यक्त करताना पुन्हा सत्ता आल्यावर ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे व्यक्त केले. ते नवी मुंबई उत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थातर्फे नवी मुंबई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक प्रचाराला अनौपचारीक सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाच वर्षांच्या कार्यअहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि मंदा म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी या उत्सवात शंकर महादेवन यांच्या गाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी ११ लाख रुपये मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात आले. तसेच प्रसिध्दी गायक संगीतकार पडमश्री शंकर महादेवन आणि वाशी खाडीत बुडणाऱ्यांचे जीव वाचवणारे मच्छिमार महेश सुतार यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a comment

0.0/5