टील यांनी काँग्रेसचा प्रचार न करता महायुतीचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. आता लोकसभा निवडणुकीला काँग्रेस राष्ट्र्वादीने सपाटून मार खाल्या नंतर दोनच दिवसापूर्वी विखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्याबरोबर राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर येत होत्या.
आघाडीतील काही आमदार आमच्या पक्षात येतील, असा दावा भाजपाकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखेंच्या संपर्कात असलेले आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर हे आमदार भाजपा मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.