Skip to content Skip to footer

शरद पवारांचे मिशन विधानसभा, पिपरी चिंचवड मध्ये बोलावली बैठक……

लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाला हवे तेवढं यश मिळवता आलेले नाही. त्यातच मावळ मतदार संघातून शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव झाल्यामुळे तो पवारांच्या जास्त जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या रणनीतीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार तसेच विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवारांना उपस्थित राहायला सांगितले आहे. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात येईल, अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे अपयश आले. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखायची ठरवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील साचलेपण दूर करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती आहे.

Leave a comment

0.0/5