पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पहिल्याच रांगेत स्थान होते असे काल राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले होते. शरद पवार यांनी राष्ट्रपती भवनाच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ३० मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण होते. मात्र शरद पवार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. शरद पवारांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याने ते नाराज झाल्याचे बोलले जात होते, याप्रकरनावरून अनेक राजकारणही झाले. दरम्यान, राष्ट्रपती भावनाने या चर्चेला पूर्णविराम दिला होता.