वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार आता केवळ बारामतीचे नेते राहिले आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन राहिलेली आहे. त्यातच आता सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात देखील केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली होती, या आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.