Skip to content Skip to footer

मंत्रीपद मिळालं नाही म्हणून काय झालं, आता पक्ष संघटना मजबूत करेल – खा. भावना गवळी

वेळोवेळी पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीला प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची भूमिका आजवर मी घेत आली आहे. माझ्या कार्यामुळे आणि कार्यकर्त्यांमुळे मतदारांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. याचाच आत्मविश्वास बाळगून मी निवडणुकीला समोर गेले. हा विजय खऱ्या अर्थाने जनतेचा विजय आहे. निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहे आणि आता मंत्रीपद मिळायलाच पाहिजे असे मत पुढे येत आहे. परंतु मंत्रिमंडळात माझा समावेश झाला नाही याची कोणत्याही प्रकारची खंत नाही. याबाबत मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे.

आता काही दिवसात विधानसभा निवडणुका येत आहेत. या दृष्टीने पक्ष बळकटकरण्या करिता जे काही करता येईल ते मी करेल असे मत नवनिर्वाचित खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केले. दरम्यान, सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांचा विविध संघटना व व्यक्ती कडून जाहीर सत्कार करण्यात आला. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय नोंदविल्यानंतर प्रथमच त्या शहरात आल्या असता हा सोहळा घेण्यात आला. दरम्यान केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्या नाराज होत्या असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

Leave a comment

0.0/5