Skip to content Skip to footer

पावसाळी अधिवेशानापूर्वी होणार राज्यात मंत्रीमंडळ विस्तार………..

राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे निश्चित झालेले नसल्याने मंत्रिपदासाठी अनेकांना वेटिंगवर रहावे लागले आहे. मात्र आता भाजपाकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाल्याचं दिसत आहे. यामुळे येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे नव्या मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागणार हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक काल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली, तत्पर्वी नवीन महाराष्ट्र सदनात राज्य कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार निश्चित होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या बैठकीला केंद्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश, महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजय पुराणिक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5