Skip to content Skip to footer

विधानसभेचे उमेदवार लवकर निश्चित करा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी….

लोकसभा निवडणुकित झालेल्या पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने, विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, नागपूर जिल्ह्यासंदर्भात चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत चर्चा झाली. जर विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी करायची असेल तर सर्वच जागांवर लवकर उमेदवार निश्चित करा, अशी भूमिका यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकीत विविध मुद्यांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी निवडणुकांचा अहवाल मांडला. त्यासोबत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या आराखड्याबाबत माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर लवकर उमेदवारांची नावे घोषित करावी अशी मागणी पदाधिकार्यांनी केली. जर पक्ष उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकत नसेल तर कमीतकमी उमेदवाराला खासगीत निरोप कळवावा , असे एका पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले

Leave a comment

0.0/5