Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या राज्यपालांच्या विरोधातल्या याचिकेवर तूर्तास सुनावणी देण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र शिवसेनेच्या या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ कायम आहे, भाजपने आपली असमर्थता दाखवल्या नंतर राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनाल बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले असले तरी पूर्ण वेळ मात्र दिला गेला नाही. त्यामुळे शिवसेनेलाही बहुमत सिद्ध करता आले नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

दरम्यान याचिका दाखल करण्याचा मुद्दा आहे. शिवसेनेने आज सकाळी याचिका दाखल करावी असे काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यानुसार सकाळी याचिका दाखल केली जाईल. त्यावर सुनावणी कधी होईल हे न्यायालय ठरवेल. या बाबतची सुनावणी तातडीने घ्यायची की ड्यु कोर्स मध्ये करायची हे ठरेल. शिवसेनेच्या वकीलांनी ठरवायचे आहे. त्यामुळे ड्यु कोर्स म्हणजे रेग्युलर याचिका. म्हणजे जेंव्हा न्यायालय वेळ देईल तेंव्हा सुनावणी घेण्यास याचिकाकर्ता तयार आहे, असा अर्थ होतो. यात ७-८ दिवस लागू शकतो. पण तातडीने सुनावणी घ्यायची असेल तर तशी मागणी शिवसेनेला करावी लागते त्यानंतर याचिका दाखल केल्यानंतर थोड्याच वेळात सुनावणी होईल.याचिका दाखल केली जाईल का हे स्पष्ट होईल.

Leave a comment

0.0/5