सामान्य जनतेला आपल्या कामासाठी सरकारी कार्यलयात आपलं जोडे झिजवावे लागतात. “सरकारी काम आणि सहा महिने थांब” अशीच काही परिस्थिती सरकारी कार्यलयात आपल्याला पाहायला भेटते. अनेक वेळा एका कार्यलयातून दुसऱ्या कार्यलयात मदत न झाल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. मात्र एखाद्या अधिकाऱ्याने अथवा मंत्र्याने सतर्कता दाखवत कारवाईची बडगा उगारल्यास काय होते, याचा अनुभव राज्य परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांना सध्या येत आहे.
झाल असं की, बुलढाण्यातील जळगाव- जामोद बसस्थानकात लावण्यात आलेले अनेक पंखे नादुरुस्त होते. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेकदा स्थानिक अधिकाऱ्यांकडून तक्रार करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी नवीन पंखे बसवून देण्याचा प्रस्ताव मुंबईतील मुख्य भांडार व खरेदी विभागाकडे पाठवण्यात आला होता. प्रस्ताव पाठवताना तातडीची बाब असल्याचे नमूद देखील करण्यात आले होते. परंतु तेथील कर्मचाऱ्यांना सदर गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.