Skip to content Skip to footer

पेंग्विन वरून आदित्य ठाकरे यांना बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक…….

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेने आणि पुढाकाराने मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात विदेशी पेंग्विन पक्षी आणण्यात आले होते. आदित्य यांच्या कल्पनेनुसार करोडो रुपये खर्च करून आठ पेंग्विन बागेमध्ये आणण्यात आले. मात्र आता याच पेंग्विनमुळे उद्यानाच्या उत्पन्नात तब्बल पाच पटींने वाढ झाली आहे. तसेच पेंग्विनमुळे वीर जिजामाता उद्यानामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा वाढलेली दिसून येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत पेंग्विन आणण्याची योजना मांडण्यात आली होती. मात्र अखेर जुलै २०१६ मध्ये आठ पेंग्विन बागेमध्ये आणले गेले. यामध्ये ३ मेल तर पाच फिमेल पेंग्विनचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये यातील एका फिमेल पेंग्विनचा मृत्यू झाला होता. यावरून शिवसेनेचे विरोधक मात्र आक्रमक झाले दिसून येत होते आणि कुठेतरी आदित्य ठाकरे यांना ट्रोल करू लागले होते. परंतु आज या पेंग्विन पक्षीमुळे बृहमुंबई महानगर पालिकेच्या उत्पनात वाढ झालेली दिसून येत आहे. आणि हेच विरोधकांना शिवसेनेचे सडेतोड उत्तर आहे.

Leave a comment

0.0/5