राज्यातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी व्हावी यासाठी शिवसेना ठाम असल्याचे युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. धाराशिवमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद वाटपाचा शुभारंभांप्रससंगी ते बोलत होते. राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसात सुरुवात झाली आहे. पाऊस येवो अथवा न येवो शिवसेनेच्या वतीने राज्यातील चारा छावण्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे ,ओमराजे निंबाळकर उपनेते आमदार सोलापूरचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील पुरुषोत्तम बरडे जिल्हाप्रमुख महेश कोठे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच ग्रामीण भागातील शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देणार असे ही शिवसेना तर्फे सांगण्यात आलेले आहे.