Skip to content Skip to footer

“त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायची गरज नाही तिची लायकी नाही” – गृहमंत्री.

“त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायची गरज नाही तिची लायकी नाही” – गृहमंत्री.

‘त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायची गरज नाही, तिची लायकी नाही’, असे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. कंगना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या व्यक्तीने पोलिसांना माफिया म्हंटल, महाराष्ट्राला बदनाम केले. त्या व्यक्तीला एक पक्ष खत पाणी घालतो हे दुर्दैवी असल्याचे म्हणत देशमुखांनी भाजपाला टोला लगावला. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, समाजाने याकडे पाहण्याची गरज आहे, असे म्हणत कंगना रणावत आणि भाजपवर जोरदार टीका केली. नागपूर येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्याबाबत देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ज्या हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. कुठलेही माफिया असतील तरीही त्यांना महाराष्ट्राचे पोलीस सोडणार नाहीत’, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5