Skip to content Skip to footer

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला….

नीरा देवघर धरणातील पाणी वाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे . १४ वर्षे पाणी पळवले, असे आरोप नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लगवलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या कही दिवसात पाण्यावरून राष्ट्रवादी पक्षात वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याबाबत अखेर राज्य सरकारने बुधवारी आदेश काढले. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. त्यांनी पत्रकार परिषदेत पक्षाचे आणि पवार कुटुंबीयांचा थेट उल्लेख करणे टाळले. १४ वर्षे पाणी पळवले, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावरही टीका केली. जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून लांब ठेवले, संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या एका खासदाराने पवारांविरोधात बंड पुकारले आहे.

खरे पाहिले तर नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ साली ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्य़ातील फलटण तालुक्याला, तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर तालुक्यांना पाणी मिळत होते. मात्र, सन २००९ मध्ये राजकीय ताकद वापरुन शरद पवार आणि अजित पवार यांनी हा पाणी वाटपाचा करारच बदलला. अणि ते पानी बारामतीकड़े वळविले होते.

Leave a comment

0.0/5