Skip to content Skip to footer

काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रातून आम्ही भूईसपाट केले – गिरीश महाजन

व्यकॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही राज्यातून भुईसपाट केले असून नव्या टीम सोबत काम करण्यास आता पुन्हा एकदा तयार असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीक्त केले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एक नव्या दमाची टीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. या नवीन मंत्र्यांचा महाराष्ट्राला आणि त्यांच्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. तसेच पुढील येणाऱ्या निवडणुकीला भाजपला याचा फायदा होणार असल्याचे महाजन म्हणाले. या मंत्रिममंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील सर्वच बडे नेते प्रवेशपूर्वी प्रथम गिरीश महाजन यांच्यात संपर्कात होते. सुजय विखे-पाटील, राधा-कृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या बड्या नेत्यांनी प्रवेश करण्यापूर्वी महाजन यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली होती मगच भाजपा पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये महाजन यांनी दशहत माजवली होती. आणि येणाऱ्या विधासभेला महाजन काय कामगिरी बाजावतात आणि विरोधी पक्षाचे किती नेते विधानसभेला फोडतात हे येणाऱ्या काही दिवसात समजून येईल.

Leave a comment

0.0/5