Skip to content Skip to footer

शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे कोल्हापुरात स्वागत..

राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवडीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांचे गुरुवारी शिवसैनिकांनी कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास आमदार क्षीरसागर यांचे छत्रपती ताराराणी चौक येथे आगमन झाले.

यावेळी त्यांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने औक्षण करण्यात आले. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर सरिता मोरे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, आदींनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर ढोलताशांच्या गजरात मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. उघड्या जीपवर आमदार क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते. ही रॅली दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटीमार्गे शिवसेना शहर कार्यालय अशी काढण्यात आली.

दरम्यान, क्षीरसागर यांनी रॅलीमार्गावरील छत्रपती राजाराम महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीमार्गावर ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

Leave a comment

0.0/5