Skip to content Skip to footer

नारायण राणे यांनीं मागितली आपल्या मुलाच्या चुकीची माफी…….

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. यासंबंधी नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी माफी मागितले आहे. निलेशने केलेल्या कृत्यावर मी माफी मागतो तसेच निलेशला सुद्धा माफी मागायला लावतो असे माजी मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखविले आहे.

यावेळी बोलताना राणे यांनी “चिखलफेक आंदोलनाचा आणि कृत्याचा निषेध करतो. नितेश लोकांसाठीच काम करतो. मी नितेशला फोन करुन तू चुकलास म्हणून सांगितले. मी माफी मागतो आणि नितेशलाही माफी मागायला लावेन. त्याने स्वत:साठी नाही लोकांसाठी आंदोलन केलं आहे. त्याची चूक ही आहे की त्याने आंदोलन सुरु केलं.

अधिकाऱ्यावर चिखल फेकणे हे अयोग्य आहे. मी माफी मागतो”, असं म्हणत नारायण राणे यांनी माफी मागितली.

Leave a comment

0.0/5