Skip to content Skip to footer

अब वायदेसे नही, कायदेसे ही होगा राम मंदिर

नगर – अयोध्या ही संतांची भूमी आहे. गौतमबुद्धांची, भगवान महावीरांची, पुरुषोत्तम रामाची जन्मभूमी आहे. श्री राम जन्मभूमीवर आम्ही दावा नव्हे, तर हक्क सांगत आहोत. ‘अब वायदे से कुछ नही होता. कायदेसेही होगा ‘ म्हणून संसदेत राममंदिर निर्माणासाठी कायदा करावा, असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे मुबई क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी केले.
श्री राम मंदिर निर्माणासाठी नगर दक्षिण जिल्हा विश्‍व हिंदू परिषद, बजरंगदलातर्फे हुंकार सभेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी गायकर बोलत होते.

प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर, सज्जनगडचे महंत मोहनबुवा रामदासी, राम महाराज झिंजुर्के, आदिनाथ महाराज शास्त्री, संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री डॉ. विजय देशपांडे, प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोहनबुवा रामदासी म्हणाले, राम मंदिर हा विषय हिंदूंच्या अस्मितेचा आहे . छत्रपती शिवरायांनी राम राज्य उभारून देव-देश आणि धर्मसाठी कार्य केले आहे. हुंकार सभा हे काही आंदोलन नवे, तर धर्माचे अधिष्ठान आहे. हुंकार सभा ही अखेरची सभा असेल कुठल्याही परिस्थिती राम मंदिर होणारच, असे सांगितले.

जाटदेवळेकर म्हणाले, रामचंद्रांचे श्रेष्ठत्व, हिंदुत्वाची जाण अंतःकरणात चेतना निर्माण केली आहे. राम मंदिर निर्माण लवकर व्हावे. कोर्ट व सरकारने हिंदू समाजावर अन्याय झाला, असे म्हणण्याची वेळ आणू नये. राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करावा, असे सांगितले.

झिंजुर्के म्हणाले, अयोध्या ही रामाची आहे. तेथे दैवत रामाचे मंदिर नसावे, ही खेदाची बाब आहे.प्रत्यक्ष जन्मभूमी कर्मभूमी असतानाही राम मंदिर तोडले गेले. ते पुन्हा उभारण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करून मंदिर उभारण्यास हरकत नाही असे सांगावे. सरकार समविचारी असले तरी इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. तेव्हा रामलल्ला हम आयेंगे मंदिर भव्य बनायेंगे, असे ते म्हणाले. या प्रसंगी तारकेश्‍वर गडाचे आदिनाथ शास्त्री म्हणाले की सर्वांची मनोमन इच्छा आहे की राम मंदिर व्हावे. सर्वांनी मन लावून कार्य केले की ते सोपे होईल. प्रार्थनेप्रमाणे कार्य करावे, असे सांगितले. याप्रसंगी जय भोसले यांनी खासदार दिलीप गांधी याना दिलेल्या निवेदनाचे वाचन केले .

या कार्यक्रमाचे प्रस्तावना दुर्गावाहिनीच्या मृणाल पडवळ यांनी केली .सूत्रसंचालन मातृशक्ती प्रांत संयोजिका शुभांगीताई दळवी यांनी केले तर आभार जिल्हा मंत्री डॉ .प्रदीप उगले यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हासहमंत्री गजेंद्र सोनवणे ,

शहरमंत्री अनिल देवराव ,बजरंगदल जिल्हा संयोजक गौतम कराळे ,प्रांत प्रचार प्रसिद्धी सदस्य अमोल भांबरकर,राजेंद्र चुंबळकर,सुरक्षा प्रमुख बाली जोशी ,विशाल रायमोकर ,सागर होनराव ,निलेश खताडे,अजित देशमुख ,तुषार मुळे,दिग्विजय बसपुरे ,ओम बांदल ,,सागर रोहोकले, गणेश कराळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a comment

0.0/5