Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे करणार महाराष्ट्रभर जन आशीर्वाद दौरा

आदित्य ठाकरे करणार महाराष्ट्रभर जन आशीर्वाद दौरा

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जुलै महिन्यापासून महाराष्ट्राचा जन आशीर्वाद दौरा करणार आहेत. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात आष्टी सिंचन प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना स्वतः आदित्य ठाकरेंनी हा दौरा जाहीर केला आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येत असल्याची चर्चा आहे. युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं मत व्यक्त केलं होता. मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी “तो निर्णय महाराष्ट्राची जनता, उद्धव ठाकरे आणि युती घेईल, यात मी काही बोलणार नाही” असं म्हटलं आहे.

“आज मी मुद्दाम इथे आलो आहे. जुलै पासून मी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा जन आशीर्वाद दौरा सुरु करणार आहे. ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत. ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत, पण माझा जन आशीर्वाद दौरा सुरु करण्याआधी मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांची मनं जिंकली.

२०१४ लोकसभा आणि विधानसभा तसेच २०१७ च्या प्रमुख महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत प्रचाराची प्रमुख धुरा आदित्य ठाकरेंनी पेलली होती.आदित्य ठाकरे हे २०१८ मध्ये शिवसेना नेते म्हणून निवडले गेले होते. यंदाच्या लोकसभेतही त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आता तर थेट राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा जन आशीर्वाद दौरा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरेल.

वाढदिवस विशेष: दिग्गज नेत्यांनाही न जमलेल्या या गोष्टी आदित्य ठाकरे यांनी करून दाखवल्या, नक्की वाचा

Leave a comment

0.0/5