Skip to content Skip to footer

भाजपात उद्या महाभारती……..

राष्ट्रवादी काँग्रेसला बुधवारी सर्वात मोठा धक्का बसणार आहे. वानखेडे मैदानातील गरवारे पवेलियनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होणार आहे. नेमका कोणाचा प्रवेश होणार याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उदया राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे. बुधवारी सकाळी गरवारे येथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

 

राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले अखेर भाजपात ?

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबईचे पवारांचे कट्टर समर्थक गणेश नाईक, माजी मंत्री मधुकर पिचड, नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे उद्या भाजपा प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

यातच नवी मुंबई महानगर पालिकेतील तब्बल ५२ नगरसेवक महापौरांसह भाजपात प्रवेश करणार आहे. परंतु या खेरीस अजून काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी भाजपात प्रवेश करू शकतात अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5