Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले अखेर भाजपात ?

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले अखेर भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालेले आहे. आपल्या कार्यकर्त्याच्या बोलण्यावरून आणि त्यांच्याशी चर्चा करू आपण हा निर्णय घेतलेला आहे असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी साताऱ्यात पार पडला.

या वेळी सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करावा अशी मागणी केली. या मेळाव्यास सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सातारा शहरातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात गेल्याने साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसू शकतो.

Leave a comment

0.0/5