Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीने केली शिवसेनेची कॉपी….

“ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी” शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी “जन आशीर्वाद यात्रे”च्या माध्यमातून राज्यभर दौरा करणारा आहे. त्यांच्या या दौऱयाचा पहिला टप्पा संपूर्ण होऊन आज पासून दुसऱ्या टप्याच्या दौऱ्याला सुरवात झालेली आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीं सुद्धा शिवसेनेची कॉपी करत “शिवस्वराज्य यात्रा ” काढण्याचे ठरविले आहे.

६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 मतदारसंघांमध्ये ही यात्रा काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी पासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. परंतु आज राष्ट्रवादीने यात्रा काढण्यापेक्षा पक्ष बांधणीकडे लक्ष दिले तर हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणार आहे. आज इतर पक्षाचे अनुकरण करण्यापेक्षा पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यावर पवारांनी भर दिला पाहिजे.

आज या यात्रेची जबाबदारी खा. अमोल कोल्हे यांच्यावर सोपवून पुन्हा एकदा राष्ट्र्वादीने निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्यायच केलेला आहे. आज पक्षात इतके वरिष्ठ नेते मंडळी असताना सुद्धा एका बाहरेच्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवून पवारांनी पक्षाचे नुकसान केले आहे. आज मुंबई अध्यक्ष सचिन अहिरे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण म्हणजे कोल्हेच आहे असे असताना सुद्धा कोल्हे यांना दिलेल्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादी मध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळुन येणार आहे.

Leave a comment

0.0/5