Skip to content Skip to footer

सेनेचे खा. डॉक्टर पुरग्रस्थ भागात व्यस्त, तर राष्ट्रवादीचे खा. डॉक्टर यात्रेत व्यस्त…..

साध्य कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पुरग्रस्थ भागात पुराचे पाणी ओसरल्यानंतर अनेक प्रकारच्या रोगराई पसरण्याचे चिन्ह दिसून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून कल्याणचे आमदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने १०० डॉक्टरची टीम आरोग्य विषयक तपासणी व उपचारांकरिता गेले अनके दिवस कोल्हापूरातील विविध भागांतील गावांमध्ये मदत कार्य करत आहे. तसेच स्वतः डॉ. श्रीकांत शिंदे रुग्णांना तपासून योग्य ते औषधपचार सुद्धा करत आहे. तर दुसरीकडे पेशाने डॉक्टर असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे मात्र पुन्हा एकदा आपल्या शिवस्वराज्य यात्रेत मग्न झालेले दिसून येत आहे.

 

पहा यांना प्रचाराची पडली आहे………..

आज दोन्ही खासदार हे पेशाने डॉक्टर असताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुरग्रस्थ भागाचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत तसेच या गावांना परिस्थितीतून पूर्वपदापर्यंत आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे ही कल्पना सुद्धा आपल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुचवलेली आहे.

 

आज विरोधकांच्या छाताडावर पाय देऊन सत्ता मिळवण्याच्या बाता करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांना या पुरग्रस्थ भागातील जनतेची काहीही पडलेली नाही असेच त्यांच्या वागण्यातून जाणवत आहे. म्हणूनच साम-दाम- दंड- भेद या वृत्तीतून पुन्हा सत्ता मिळ्वण्याचे स्वप्न अमोल कोल्हे पाहत आहे. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे पुरग्रस्थांना सर्वोतोपरी मदत करत आहे आणि हीच खरी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आज शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या वागण्यातून दिसून येत आहे.

2 Comments

  • Julia
    Posted January 17, 2020 at 1:15 pm

    I am sure this paragraph has touched all the
    internet viewers, its really really fastidious piece of writing on building
    up new weblog https://checkersmoda.com

Leave a comment

0.0/5